एक्झिट पोल्स / दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी हॅट्रिक मारणार




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - 70 विधानसभा जागांसाठी दिल्लीमध्ये आज मतदान पार पडले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत 57% मतदान झाले. शाहीन बागसहित राजधानीतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोल्स येणे सुरू झाले.






5 एक्झिट पोल्समध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर भाजप नंबर दोनवर असेल. भाजपला दिल्लीत जास्तीत- जास्त 26 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. 2015 च्या निवडणुकीत आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या तर भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post