'त्या' जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - सिल्लोड (जि. औरंगाबाद) जळीतकांडातील महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला आगीत ९५ टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित महिला घरात एकटीच राहायची. २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील संतोष मोहिते तिच्या घरी आला. तो अवेळी घरी आल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले व घराची कडी लावून पळून गेला. महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या शेजाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली व पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आरोपीस न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.