कोरोनाचे ७१९ बळी ; आरोग्य यंत्रणा हाताळताना चीनची दमछाक



माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ७१९ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३४ हजारावर पोहोचला आहे. दोन दशकांपूर्वी सार्स आजारामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा कोरोना विषाणूने पार केला आहे.

कोरोना विषाणू चीनमध्ये पसरण्याचा इशारा देणा-या डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. तसेच ज्या पद्धतीने चीन आरोग्य आणिबाणी हाताळत आहे, त्यावरूनही नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. चीनबाहेर कोराना विषाणू संसगार्मुळे दोन बळी गेले आहेत. त्यातील एक बळी हाँककाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २५ देशांमध्ये कोरोना पसरल्याची भीत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

जगभर या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणा-या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post