'यांनी' बनवले कोरोना व्हायरसचे औषध



माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग- चीनच्या वुहान शहरातून भारतात परतलेल्या 645 नागरिकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांचे टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याची माहिती दिली. या सर्वांना दिल्लीतील आयटीबीपी कँप आणि मानेसरच्या आर्मी कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. यातच आता व्हायरसच्या औषधावरुन अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू होण्याची शक्यता आहे.

अमेरिकी कंपनी गिलीयड सायंसने कोरोना व्हायरसचे औषध तयार केले आहे आणि याच्या पेटेंटसाठी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे चीनला पेटेंट आपल्या नावावर करायचे आहे. चीन सरकारच्या वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने पेटेंटवर बोलताना ही बाब स्विकार केला की, यात बौद्धीक संपत्तीच्या कायद्याचा अडथळा येणार आहे. पण, ही संस्था राष्ट्रीय हितांच्या रक्षणासाठी काण करते.

भारताने चीनी पासपोर्टवर जारी सर्व वीजा (5 फेब्रुवारीच्या आधीचे) सस्पेंड केले आहेत. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणताही परदेशी जो 15 जानेवारीपर्यंत चीनमध्ये गेला होता, त्याला सध्या भारतात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पण, त्यांनी हेदेखील सांगितले की, हाँगकाँग, मकाऊ आणि ताइवानच्या चीनी पासपोर्ट धारकांसाठी हे नियम लागू नाही. जगात आतापर्यंत 565 जणांचा मृत्यू झाला आहे तर 28,292 जणांना या आजाराची लागन झाली आहे. चीनमध्ये 563 आण हाँगकाँग-फिलीपींसमध्ये 1-1 तरुणांचा मृत्यू झाला.

हुबेईमध्ये बुधवारी 70 जणांचा मृत्यू
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगने गुरुवार सांगितले की, हुबेई प्रांतात बुधवारी 70 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये 28,035 जणांना या आजाराची लागन झाल्याचे समोर आले आहे. तर, थायलँडमध्ये कोरोनाची लागन झालेला एक व्यक्ती पूर्णपणे बरा झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post