आज हनुमानजींनी दिल्लीवर कृपा केली...




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीतील ईव्हीएममुळे भाजपला चांगलाच धक्का बसला. आम आदमी पार्टीने सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवले. शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुद्द्यावर लढलेल्या आपने ७० पैकी ६२ जागा जिंकून २०१५ची पुनरावृत्ती केली. तर, सीएएविरुद्ध जामिया व शाहीन बागमधील निदर्शनांचा मुद्दा घेऊन लढलेल्या भाजपला केवळ ८ जागा मिळाल्या. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक प्रचार करूनही भाजप गेल्या वेळेपेक्षा पाचच जागा अधिक जिंकू शकला. दुसरीकडे १५ वर्षे दिल्लीवर राज्य गाजवलेल्या काँग्रेसला या वेळीही खाते उघडता आले नाही. मुख्यमंत्रिपदाची हॅट‌्ट्रिक करणारे “आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, “आज मंगळवारी हनुमानजींनी दिल्लीवर कृपा केली आहे.’

यामुळे दिल्ली आताही शाह-हीन
रणनीती - चक्रव्यूहात अडकले नाहीत केजरीवाल, ध्रुवीकरणाची प्रत्येक चाल ओळखून भाजपला घेरले, पण मोदींवर टीका टाळली

भाजपने शाहीन बागवरून केजरीवाल यांना राष्ट्रद्रोही संबोधले. यावर केजरींनी रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी अमित शहांवर टाकली. अतिरेकी संबोधल्याच्या मुद्द्यावर ‘मी वृद्धांना तीर्थयात्रा घडवतो,’ असे उत्तर दिले. मुस्लिमांचे हितचिंतक दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा केजरींनी हनुमान चालिसा गायला. पाकच्या मंत्र्याने भाजपला हरवण्याचे ट्विट केले तेव्हा ‘हस्तक्षेप नामंजूर, माेदी माझेही पंतप्रधान आहेत,’ असे बाणेदार उत्तर दिले. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यावर नारे-होर्डिंग बदलले. मोदींवर टीका केली नाही. ध्रुवीकरण रोखले. वीज-पाणीसारख्या मुद्द्यांवरच ६८ मतदारसंघांत रोड शो केले.

याउलट भाजप २४० खासदार, ११ मुख्यमंत्र्यांना आणूनही भारत-पाक करत राहिला

भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घाेषित केला नाही, ना विकासाचे व्हिजन दिले. त्यांचा संपूर्ण प्रचार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रवाद, भारत-पाक, हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवरच रेंगाळला. काँग्रेस आपची मते फुटू नये म्हणून भाजपला रोखण्यासाठी संपूर्ण ताकदीने लढलीच नाही

पुढे काय : आप राष्ट्रउभारणीकडे, बिहारवर नजर
आपच्या कार्यालयात नवे पोस्टर झळकले. त्यावर लिहिले होते ‘राष्ट्रउभारणीसाठी आपमध्ये या.’ केजरीवाल पुन्हा ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा प्रयत्न करतील. बिहारमध्ये यंदाच निवडणुका आहेत. आपचे चाणक्य प्रशांत किशोर काँग्रेसच्याही जवळचे आहेत. तेथे काँग्रेस-आरजेडीसोबत अवघे विरोधक एकवटू शकतात.

भाजप सदस्य गेले कुठे ?
दिल्लीत भाजपचे ६२.२८ लाख सदस्य आहेत, पण पक्षाला फक्त ३५ लाख ६६ हजार ६४४ मते
निवडणुकीपूर्वी भाजप सांगत होता की, दिल्लीत आमचे ६२.२८ लाख सदस्य आहेत. म्हणजे भाजपच्या निम्म्या सदस्यांनी ‘आप’ला मतदान केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे दिल्लीत ७ लाख सदस्य असल्याचा दावा केला जातो. त्यांना फक्त ३.९५ लाख मते मिळाली. म्हणजे त्यांचीही निम्मी मते ‘आप’ ला गेली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post