न्यूझीलँडकडून भारताचा पराभव


माय अहमदनगर वेेेब टीम
स्पोर्ट डेस्क - न्यूजीलँडने तीन वन-डे सामन्यांच्या सीरीजमधील पहिल्या सामन्यात भारताला 4 विकेट्सने पराभूत केले आहे. आज(बुधवार) हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूजीलँडने टॉस जिकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 50 ओवरमध्ये 4 विकेट्स गमावून 347 धावांचा डोंगर न्यूजीलँड समोर उभा केला होता. पण हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलँड संघाने 48.1 ओव्हर्समध्येच 6 विकेट गमावून 348 धावा काढत सामना आपल्या नावावर केला. यापूर्वी मागच्या वर्षी झालेल्या विश्वचषकात न्यूझीलँडने भारताला पराभूत केले होते.

न्यूजीलँडच्या रॉस टेलरने करियरचे 21वे शतक ठोकले. टेलरने एका वर्षानंतर शतक झळकावले आहे. मागच्या वेळेस टेलरने 8 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध 137 धावा काढल्या होत्या. दुसरीकडे कर्णधार टॉम लाथमने 48 चेंडूत 69 धावा काढल्या. तर हेनरी निकोल्सने 78 रन काढले. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक 103 आणि लोकेश राहुलने 88 धावा काढल्या तर कर्णधार विराट कोहलीने 51 आणि केदार जाधवने नाबाद 26 रन काढले.

अय्यरने करियरचे पहिले शतक झळकावले आहे. अय्यर आज आपल्या करिअरमधील 16 वा सामना खेळत होता. अय्यरने राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 136 रनाची भागीदारी केली. राहुलने वन-डेमध्ये आपला 7वे आणि कोहलीने 44वे अर्धशतक झळकावले. कोहलीने अय्यरसोबत साथ 102 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे पृथ्वी शॉ 20 आणि मयंक अग्रवाल 32 धावा काढून आउट झाले. दोघांनी आपला वन-डे डेब्यू केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post