शहरात 17 फेब्रुवारीला रंगणार युवक-युवतींचा ग्रॅण्ड फिनाले शो


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हेलपिंग हॅण्डस युथ व मुक्तांगण फाऊंडेशनच्या वतीने सोमवार दि.17 फेब्रुवारी रोजी सावेडी येथे ग्रॅण्ड फिनाले शो रंगणार आहे. यामध्ये युवक-युवतींचा फॅशन शो होणार असून, महिलांना देखील रॅम्प वॉक करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिध्द अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सिनेसृष्टी मधील निर्माते, दिग्दर्शक, मॉडलिंग क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी शहर व उपनगरात ऑडिशन्स घेण्यात आल्याची माहिती हेलपिंग हॅण्डसचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी दिली.
युवक-युवतींना मॉडलिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीकोनाने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ग्रॅण्ड फिनाले शो चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्राची आवड असलेल्या महिलांना देखील एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले आहे. यामध्ये विविध थिमद्वारे युवक-युवती आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करणार असून, लहान मुलांसाठी देखील विशेष रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरात घेण्यात आलेल्या ऑडिशनला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. निवड झालेल्या युवक व विद्यार्थ्यांना रॅम्प वॉक, मॉडलिंग क्षेत्रासंबंधी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माजिद पवार, अतुल पानसरे, मोहसीन खान, मंगळ डफळ, तबरेज शेख, राजू तांबोळी, अदनान शेख, सागर खकाळ, आदिल शेख, सोहेल शेख, निखिल त्रिंबके, स्मिता इथापे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे स्पर्धेचे परिक्षण इंडिया विनर असलेले मॉडेल करणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, मॉडलिंग संबंधी सर्व मार्गदर्शन व लघू चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी 7875060726 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post