पायांना भेगा पडल्यात... तर असा करा घरगुती उपाय


माय अहमदनगर वेब टीम
गुलाबी थंडी सर्वाना हवीहवीशी वाटत असते, मात्र थंडीमध्ये शारीरिक समस्या, अंग उलने, टाचांना भेगा पडणे.. अशा अनके समस्या आपणास जाणवतात.
आपले सौंदर्य व आरोग्य जपण्यासाठी नेहमीचं महागड्या ट्रेंटमेंट्स किंवा प्रॉडक्ट्सची गरज नसते. तर साधे घरगुती उपाय देखील फार फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ असेच काहीसे उपाय....
1) मीठ आणि गरम पाणी : रात्री झोपण्याच्या आधी गरम पाण्यात मीठ घालून तुम्ही आपले पाय अर्धा तास त्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या टाचा मऊ आणि मुलायम होतील.
2) नाराळाचे तेल : तुम्ही टाचांवर क्रिमच्या ऐवजी नारळाच्या तेलाने सुद्धा मालिश करू शकाता. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने मसाज करा. असे केल्यास सकाळी पाय मुलायम झालेले दिसून येतील. महिनाभर हा प्रयोग करावा.
3) जर टाचांना भेगा पडल्या असतील तर नारळाचं तेल सगळ्या केमिकल्सयुक्त औषधांपेक्षा श्रेष्ठ ठरत असतं. नारळाच्या तेलात एंन्टीइफ्लामेंटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेवर मऊपणा राहण्यास मदत होते.
4) कोरड्या त्वचेसाठी नारळाचं तेल सगळ्यात उत्तम उपाय आहे. तसंच मृतपेशींना दूर करून पायांना व्यवस्थित करण्याचं काम नारळाच्या तेलामुळे होत असतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post