अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: पारनेर तालुक्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील काळेवाडी, जामगाव, सारोळा अडवाई भागासह काही ठिकाणी गारांचा पाऊस सुरू आहे.
२४ तारखेपासून राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपिटीचे सावट असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काळेवाडी, जामगाव, सारोळा अडवाई, तसेच परिसरात काही ठिकाणी गारांसह, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. सावेडी उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दुसरीकडे, नागपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात गारपिटीचा अंदाजही व्यक्त केला आहे. नाशिकच्या काही उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.


राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता
२४ तारखेला म्हणजेच आज, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांसह पुणे विभागातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २५ तारखेला जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत; तर नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर २६ तारखेला प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नाशिक जिल्हा, खान्देश आणि मराठवाड्यातील उत्तरेकडे असलेल्या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post