'अक्षय'चे कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी दान; ट्विंकल म्हणाली मला त्याचा अभिमान


माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क : कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये अक्षय कुमारने पंतप्रधान मदत निधीमध्ये 25 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने त्याच्या या पाऊलचे कौतुक केले आणि म्हणाली की, ती तिला अक्षयचा अभिमान वाटतो. ट्विंकलनुसार, तिने अक्षयला एवढी मोठी रक्कम दान करण्याबद्दल प्रश्न केला होता आणि त्यांनंतर तिला जे उत्तर मिळाले ते खरंच खूप भावनिक आणि प्रेरणादायी आहे.

ट्विंकलने अक्षय कुमारचे ट्वीट री-ट्वीट करत सांगितले की, "मला या व्यक्तीचा अभिमान आहे. जेव्हा मी त्याला विचारले की, त्याने याबद्दल योग्य विचार केला आहे का की, ही खूप मोठी रक्कम आहे आणि एवढी आपण देण्याची गरज आहे का ? तेव्हा तो केवळ एवढेच म्हणाला, जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते आणि आता जेव्हा मी या परिस्थितीत आहे की, मी लोकांसाठी काहीतरी करू शकतो, तर मी स्वतःला कसा रोखू शकतो."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post