कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजी बाजारावे ठिकाणी नागरीकांची होणारी गर्दी टाळणेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथील फळे व भाजीपाला बाजार भरणेस दि. 31 मार्चपर्यंत पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

कोणतीही व्यवती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) घ्या कलम 188 नुसार दंडनिय/कार्यदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी य त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन हे आदेश जारी करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post