चीनमध्ये पुन्हा नवीन व्हायरस : 'हंता' व्हायरस कोरोनापेक्षा 24 % जास्त धोकादायक
माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग- जगभरात 15 हजारांपेक्षा जास्त बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसचा धोका अजून टळला नाही. हा व्हायरस जगभरात पसरत आहे, यातच आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आला आहे. चीनच्या युनान राज्यात बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चीनी मीडिया ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार, हा मृत्यू 'हंता' व्हायरसमुळे झाला आहे. काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, हंता व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका कोरोना व्हायरसपेक्षा 24% जास्त आहे. ग्लोबल टाइम्सने सांगितले की, युनानवरुन शेंगडॉन्गला जात असलेल्या व्यक्तीचा मृत्यू हंता व्हायरसमुळेच झाला आहे. त्या बसमध्ये इतर 32 प्रवासी होती, सध्या त्या सर्वांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
Post a Comment