माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे तसेच पोलीस विभाग व इतर आपत्कालीन यंत्रणांना आवश्यकतेनुसार मदतीस उपलब्ध राहणेकामी जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी दि.31 मार्चपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. कोणीही पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे या आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायादा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
Post a Comment