होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यास धक्काबुक्की ; तिघां विरोधात गुन्हा


माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव : कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेला “होम क्वारंटाईनचा” शिक्का मारणे व मास्क लावा, असे सांगण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील तिघांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी महसूलचे कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

देर्डे-कोऱ्हाळे येथील मूळ रहिवासी असलेले दोन मुले व त्यांचे वडील कल्याण येथे कामा निमित्त राहतात मात्र राज्यात व देशात कोरोनाची साथ सुरु झाल्यावर ते १८ मार्च रोजी आपल्या गावांमध्ये आले जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यत लागू केलेल्या प्रतिबंधाचे पालन देर्डे-कोऱ्हाळे या गावी होत नसल्याची बाब काही नागरिकांनी तहसीलदारांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी आपले पथक या गावी पाठवले या पथकातील कर्मचारी रवींद्र देशमुख यांनी या तिघांना आपल्या तोंडास मास्क लावत नाही त्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव होईल अशी समज दिली. घरात बसण्यासाठी ‘होम क्वारंटाईन’ चा शिक्का मारून घेण्यास सांगितले असता त्यांनी या पथकातील सदस्यांना, ”तुम्ही कोण समजून सांगणारे, आम्हाला त्याची गरज वाटत नाही. तुम्हीच येथून निघून जा” असे सांगत देशमुख यांची सदऱ्याची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना घडली आहे. हे कृत्य म्हणजे सरकारी कामात अडथळा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post