ऑलिम्पिकनंतर आयपीएल रद्द होणार
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आयपीएल १३ होणे कठीण झाले आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत विदेशी खेळाडूंचा व्हिसा रद्द झाला. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अशात लीग रद्द होऊ शकते. टोकियो ऑलिम्पिक पहिलेच एका वर्षासाठी स्थगित करण्यात आले. बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलला कोरोना व्हायरसमुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले होते. मात्र, स्थिती आणखी गंभीर झाली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी मंगळवारी म्हटले की, ‘मी सध्या आयोजनावर काही सांगू शकत नाही. आम्ही त्याच स्थानी आहोत, ज्या वेळी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १० दिवसांत काही बदल झाला नाही.’ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक वाडियांनी म्हटले की, ‘बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्यावर विचार केला पाहिजे. मेपर्यंत स्थितीत बदल न झाल्यास आमच्याकडे कितीसा वेळ शिल्लक राहील? तेव्हा विदेशी खेळाडूंना देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का?’
Post a Comment