देशात कोरोनाचा हाहाकार ; 14 दिवसात 10 जणांचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -देशात कोरोना व्हायरस संक्रमाणाची परिस्थिती गंभीर बनली आहे. संक्रमितांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. मागील 14 दिवसात संक्रमाणामुले 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7 जणांना शुगर किंवा ब्लडप्रेशरची समस्या होती.महाराष्ट्रात सर्वात जास्त 101 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केरळ (95) आहे. तसेच मंगळवारी मणिपुरमध्ये संक्रमणाचे पहिले प्रकरण समोर आले. 23 वर्षीय संक्रमित मुलग्गी अशातच ब्रिटनहून परतली होती.

संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी 30 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पूर्णपणे लॉकडाउनची घोषणा केली आहे. 5 राज्यात कर्फ्यू लावला गेला आहे. देशभरात लॉकडाउन आणि कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस बॅरीकेडिंग करून केवळ गरजेच्या कामांसाठी येण्या जाण्याची परवानगी देत आहे. दिल्लीमध्ये सोमवारपासून लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी उल्लंघन करणाऱ्या 1012 लोकांवर केस दाखल केल्या गेल्या. यादरम्यान आंध्र प्रदेश सरकार म्हणाले की, परदेशावून परतलेल्या लोकांची ओळख पावण्यासाठी मेडिकल टीम लोकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post