मुंबई, दिल्लीसह 14 राज्यांतील 287 शहरांमध्ये लॉकडाउन



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा देशात फैलाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, पाटणा आणि सुरतमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील मुंबईत 63 वर्षीय व्यक्तीचा, सुरतमध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा तर बिहारची राजधानी पाटण्यात 38 जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि पाटण्यात निधन झालेल्या कोरोनाग्रस्तांना मधुमेह आणि इतर आजार सुद्धा होते. तर सुरतमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाला किडनीचा विकार होता. देशभर आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी 6 पीडित मधुमेही होते. देशात संक्रमाची आकडेवारी पाहता ती वाढून आता 362 झाली आहे. तर वाढत्या आकडेवारीमुळे अख्खा देश लॉकडाउनच्या दिशेने जात असताना दिसून येत आहे. आतापर्यंत 14 राज्यांच्या 287 शहरांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post