महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाने महाराष्ट्रात दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही तासांतच राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 64 वरून 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेआहे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे.
मुंबईतील रुग्णांची संख्या 74 झाली आहे. शनिवारपर्यंत ही संख्या 64 वर होती.आज 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामतील6 मुंबई आणि 4 पुण्याचे रुग्ण आहेत. आज कोरोना बाधीतांमधील एका 63 वर्षीय रुग्णाचा मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयातमृत्यू झाला.ही व्यक्ती 21 मार्च रोजीरुग्णालयात दाखल झाली होती. आता महाराष्ट्रात कोरोनाचे दोन बळी गेले आहे.
Post a Comment