हायप्रोफाइल पार्टीतून राष्ट्रपती भवनात पोहोचला कोरोना
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात शुक्रवारी कोरोनाबाधेचे सर्वाधिक ६३ रुग्ण आढळल्याने संख्या २६० झाली. यापैकी २३ जण पूर्णपणे बरे झाले. दरम्यान, बॉलीवूड गायिका कनिका कपूरही कोरोना पॉझिटिव्ह ठरली. ९ मार्चला लंडनहून परतल्यानंतर १४ दिवस वेगळे राहण्याऐवजी ती लखनऊमध्ये पार्ट्या करत राहिली. यादरम्यान ती ४०० हायप्रोफाइल लोकांच्या संपर्कात आली. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह व यूपीचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यात सहभागी होते. पार्टीत कनिकासोबत सेल्फी घेणारे दुष्यंत संसदेत व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले. दरम्यान, वसुंधरा आणि दुष्यंत यांनी आता स्वत:ला वेगळे ठेवले आहे. या प्रकरणी कनिकावर गुन्हा दाखल होणार आहे.
Post a Comment