माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : करोना व्हायरसमुळे सध्या जगभरात गर्दी टाळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी नगर शहरासह जिल्ह्यातही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने काही नियमावली जाहीर केली आहे. नगरमध्ये त्यानुसार गर्दी टाळली जात आहे. मात्र, तरीही किराणा सामान खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे. अशावेळी काही नामांकित दुकानदार फर्म यांनी थेट घरपोहोच किराणा देण्याची सेवा देऊन नागरिकांना मोठा आधार दिला आहे. यानिमित्ताने नगर शहरात होम डिलिव्हरी सेवा रुजण्यास सुरुवातही झाली आहे.
सर्व सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नसतानाच सर्व खासगी दुकाने बंद केल्याने सध्या नागरिक खूप महत्वाच्या कामासाठीच घराच्या बाहेर पडत आहेत. नगरसारख्या छोट्या शहरात तर, हॉटेल्स व अशी दुकाने बंद झाल्याच्या निर्णयाचा नागरिकांनी आनंदाने स्वीकार केला आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपर्क टाळणे व एकमेकांना न भेटणे हाच सर्वोत्तम खबरदारीचा उपाय आहे. त्यामुळे नागरिक जिल्हा प्रशासनाला मदत करीत आहेत. तसेच किराणा दुकानात जाऊन खरेदी करताना गर्दी करण्यापेक्षा बहुसंख्य सुज्ञ नागरिक कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय वापरत आहेत. होम डिलिव्हरी सेवेमुळे गर्दी होण्याची शक्यता कमी होते. तसेच रिस्क कमी झाल्याने नागरिक यास पसंती देत आहेत. काही दुकांनामध्ये आता नव्याने होम डिलिव्हरी सेवा यानिमित्ताने सुरू होत आहे.
नागरिकांचा प्रतिसाद वाढला
याबाबत लोकरंग मेगामार्टचे संचालक संतोष वाघ यांनी सांगितले की, आम्ही वर्षभरापासून नगर शहरात घरपोहोच किराणा सेवा सुरू केलेली आहे. नगरमधील सुमारे हजार ग्राहक आमच्याकडे प्रतिमाह किराणा यादी पाठवून सेवेचा लाभ घेतात. या व्हायरसच्या निमित्ताने आता शहरातील नवे ग्राहक आमच्या सेवेला जोडले जात आहेत. स्वच्छ, शुद्ध आणि दर्जेदार किराणा ग्राहकांना रास्त भावात देतानाच आम्ही आमच्या दुकानात स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देतो. त्यामुळेच आमच्या सेवेला नगरकरांनी प्रतिसाद दिलेला आहे. आताही ग्राहकांनी दुकानात गर्दी करण्याचे टाळून आमच्याकडे ९५५१९१५०५० या मोबाइल व्हाटस्अॅप नंबरवर यादी पाठवून होम डिलिव्हरी सेवेचा लाभ घ्यावा.
होम डिलिव्हरी सेवा खूप उपयोगी
याबाबत डॉ. प्रफुल्ल गाडगे (संचालक, बायोमी टेक्नॉलॉजी, केडगाव औद्योगिक वसाहत, अहमदनगर) यांनी म्हटले की, हा व्हायरस एकमेकांच्या संपर्कात आल्याने वाढत आहे. करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना हा आजार होऊ शकतो. नागरिकांनी अशावेळी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच दुकानात किराणा आणण्यासाठी जाऊन तिथे गर्दीमध्ये रिस्क घेण्यापेक्षा होम डिलिव्हरी सेवेद्वारे किराणा मागवून घ्यावा. आपल्या सुरक्षिततेसह सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सरकारी सूचना व नियम पाळावेत. तसेच दुध, भाजीपाला व किराण्यासाठीही गर्दी टाळावी.
Post a Comment