कोरोनावर मोठी घोषणा ; देशभरात लॉकडाऊन - 21 दिवस बाहेर पडू नका- पंतप्रधान
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 पासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अदाजही लावता येणार नाही. देशात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्यायला हवे. आरोग्य क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता, देशात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठीच आज रात्री 12 वाजल्यापासून देशभर लॉकडाउन जारी केला जात आहे.
कोरोनाविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी निर्णय आवश्यक होता...
हिंदुस्थानाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.
Post a Comment