निराधारांच्या मदतीला धावले गोरेगावमधील युवक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - संचारबंदीच्या कालावधीत गोरगरीब निराधारांची उपासमार होऊ नये, म्हणून गोरेगाव गावातील युवकांनी सामाजिक ऐक्याची परंपरा कायम ठेऊन मदतीचा हात दिला आहे. गोरेगाव येथील नवयुग मिञ मंडळ व प्रेरणा प्रतिष्ठाण यांनी पुढाकार घेऊन गावातील गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला मोफत देऊन निराधारांना आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम चालू केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रतिबंधक उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचारबंदी लागू आहे. अशा आपत्कालिन परिस्थितीत गोरगरीब निराधार कुटुंबियांची उपासमार होऊ नये, याकरिता सगळीकडे सामाजिक संघटना मदतीला पुढे येऊ लागलेल्या आहेत. निराधारांना आधार म्हणून गोरेगाव गावातील गरीब कुटुंबियांना घरपोच जीवनावश्यक किराणा माल व भाजीपाला देण्याचा स्तुत्य उपक्रम आजपासून हाती घेतला आहे.
Post a Comment