तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना मिळणार




माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली शिवभोजन थाळी केवळ पाच रुपयात मिळणार आहे. ही थाळी मिळण्याच्या वेळतही वाढ करण्यात आली आहे. रोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ही थाळी आता 10 रुपयांऐवजी केवळ पाच रुपयांना मिळेल, अशी घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवभोजन थाळीसाठी 160 कोटींचा कार्यक्रमाची आखणी
भुजबळ म्हणाले की, शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. रोज एक लाख लोकांना ही थाळी देण्यात येईल असेही भुजबळ म्हणाले. पुढील तीन महिन्यांसाठी ही सवलत देण्यात आली असून यासाठी 160 कोटींचा कार्यक्रम आखला आहे. कोरोनामुळे ज्यांना अन्न मिळत नाही, बेघर आहेत त्यांना शिवभोजनमध्ये जेवण मिळणार असल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post