बारामतीमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशात हाहाकार माजवलेला कोरोनाने आता बारमतीमध्ये शिरकाव केला आहे.शहरातील एका रुग्णालाकोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. रुग्णाने बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला आहे. तसेच लोकांना भेटला असल्याने अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो रुग्ण राहत असलेल्या 3 किलोमीटरचा परिसर बंदकरण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा उपचारमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत मोफ केला जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.सध्या राज्यात मृतांचा आकडा 8 वर पोहचला आहे.
काल (27 मार्च) रोजी बुलडाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज समोर आले आहे. न्युमोनियामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे काल आरोग्य प्रशासनाने सांगितले होते. मात्र, आता त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
Post a Comment