रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांचा विमा काढणार


माय अहमदनगर वेब टीम
पुणे- काेराेना रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात सध्या डाॅक्टर, नर्स उपचार करत असून या गंभीर राेगाचा सामना रात्रंदिवस काम करून ते करत अाहेत. डाॅक्टर, नर्स यांचा जीव महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकारने करणे गरजेचे अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, नर्सचा विमा लवकरच काढला जाणार असून त्याबाबत मुंबईत निर्णय घेऊन जीअार काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली अाहे.
पवार म्हणाले, राज्यात काेराेना बाधितांची संख्या ५२ झाली अाहे. शासनाने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अातापर्यंत काढलेल्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी ही ३१ मार्चपर्यंत हाेणार हाेती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ती शासनाचा पुढील अादेश निघेपर्यंत अनिश्चित काळासाठी लागू असणार अाहे. अंत्यविधी, दहाव्या, तेरावा या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाेकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. लग्नाच्या तारखा पुढे ढकलणे अावश्यक असून सदर तारखा पुढे न ढकलल्यास २५ लाेकांच्या उपस्थितीत लग्नसाेहळा पार पाडावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post