महाराष्ट्रात लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांची घोषणा





माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने राज्यात नाइलाजाने कलम 144 लागू केली जात आहे. केवळ मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नव्हे तर सर्वच नागरी भागांमध्ये ही संचारबंदी लागू राहील. मध्यरात्रीपासून कुणीही दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणार नाही. परदेशी फ्लाइटला देशात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, विनाकरण गर्दी करू नका. टोळक्यांमध्ये फिरू नका. 31 मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यापुढे गरज पडल्यास आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यात जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना सूट दिली जाणार आहे.

आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम १४४ लागू लागू करीत आहोत. आज मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहनी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू देऊ नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.

मंदिर, मशिदी आदी सगळी धार्मिक स्थळं बंद ठेवावीत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. उगाचच अन्न धान्यांचा साठा करू नका. शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी आहे. करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post