अहमदनगर जिल्ह्यातील १७ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा; १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित १७ अहवालाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५१३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४३१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत.
Post a Comment