अहमदनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण वाढला ; नेवासे येथील बाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह


उर्वरित ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील असून दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. आज त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post