८३ अहवालापैकी ८२ अहवाल निगेटिव्ह ; अहमदनगरमध्ये 1 कोरोनाबाधित वाढला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. त्यापैकी ८२ अहवाल निगेटीव आले असून एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून या अहवालांची अद्याप प्रतिक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ झाली असून यात एक जण बीड जिल्ह्यातील असून दुसरा व्यक्ती मूळची श्रीरामपूर तालुक्यातील असून पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ८७३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २५० जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आतापर्यंत ८४४ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर ७२८ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. एकूण ४६६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील ही व्यक्ती आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
Post a Comment