माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मुंबई उच्चन्यायालयाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याबरोबरच न्यायलयीन कामकाजात कपात करण्यात आली आहे. तरीही कोणीही न्याया पासून वंचित राहू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधाद्वारे न्यायदानाचे काम चालू आहे. ज्या योगे कोणालाही न्यायालयीन कामकाजात भाग घेण्यासाठी निवासस्थानाबाहेर जाण्याची गरज नाही. तसेच सोशल डीसटंन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांचा न्यायालयातील प्रत्यक्ष सहभाग टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाच्या खंडपीठा प्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायदानाची सुविधा आता सर्वच जिल्हान्यायालयात सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता नगरच्या जिल्हा न्यायालयातही लवकरच जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे खटले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चालवले जाणार आहेत. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सुनीलजीत पाटील यांनी दिली.
Post a Comment