अहमदनगरकरांच्या पुन्हा डोक्याला ताप ; आणखी 2 रुग्ण वाढले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत जामखेड येथील आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३३ झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. सध्या बूथ हॉस्पीटल मध्ये ०९ जण उपचार घेत आहेत.तर या बाधीत दोन रुग्णांना आता तिथे हलवले जाणार आहे.

जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे २९ आणि ३५ वर्षीय मुलगे बाधीत असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्ती बाधीत असल्याचे आढळून आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post