जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित आढळला; एकूण संख्या आता अठरा
७३ पैकी ३५ स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३५ अहवाल प्राप्त झाले असून त्यात नगर शहरातील एक ७६ वर्षीय व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता अठरा झाली आहे. त्यापैकी दोघांना त्यांचे १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज बाधित आढळलेली व्यक्ती ही कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
Post a Comment