अहमदनगरमध्ये अजून तीन कोरोनाबधित वाढले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर मध्ये आता एकूण बाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेची दिली.
Post a Comment