माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, गुरुवारी (दि.२) रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 9 कोरोना बाधित वाढल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील तपासणीचे अहवाल गुरुवारी दिवसभरात प्राप्त झाले. दुपारी सहा रुग्णांना कोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. रात्री ६० अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात संगमनेर मधील दोघांचा तर जामखेड मधील एका तरुण व्यक्तीचा समावेश आहे. हे तिघेही परदेशी नागरिकांच्या संपर्कात होते. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या सतरावर पोहोचली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment