कॅन्टोन्मेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून 'या' बाबींना परवानगी
लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे राहणार बंधनकारक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. ज्या अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यात, कृषी, आस्थापना, सामाजिक क्षेत्र, वन उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि पशू संवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयीसुविधा आदीसह विविध बाबींचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्हयामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेकामी यापूर्वीच खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारीत केलेले आहेत. त्याची कार्यवाही सुरू राहणार असून जिल्हयातील कन्टेन्मेन्ट झोन वगळता विविध उपक्रमांचवअतिरीक्त बाबींचा समावेश करण्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत
1.जिल्हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅटोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये सर्व खाजगी वाहने व सर्व खाजगी प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाच्या वाहतुकीत प्रतिबंध (आदेश क्र
आव्यमपु/कार्या 19अ/219/2020 दिनांक 22/03/2020 ) हा ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
२.फौजदारी प्रकिया संहिता1973चे कलम 144 चे आदेशान्वये मनाई असलेल्या बाबी व सुट दिलेल्या बाबी (आदेश क्र.डी.सी./कार्या9ब1/855/2020, दि.14/04/2020) हा
दि.30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत पर्यंत दि.03 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
३.फौजदारी प्रकिया संहिता1973 चे कलम 144 चे पेट्रोल व डिझेल विक्रीची वेळ निश्चित करणेबाबतचे आदेश (क्र.डी.सी./कार्या9ब1/856/2020, दि.15/04/2020) हे
दि.03 मे पर्यंत लागू राहणार आहेत.
४.फौजदारी प्रकिया संहिता1973 चे कलम 144 चे औषधे व औषधेतर वस्तुंच्या विक्रीबाबत आदेश (क्र.डी.सी./कार्या9ब1/859/2020, दि.17/04/2020) दि.30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत पर्यंत दि.03 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
५. अहमदनगर जिल्हयातील उदयोग / औदयोगीक आस्थापना (सरकारी व खाजगी दोन्ही) कार्यान्वीत करणेबाबत.(आदेश क्र
आव्यमपु/कार्या 19अ/328/2020 दिनांक 20/04/2020) हा ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
जिल्हयातील Containment Zone वगळता खालील उपक्रमांना (Activities) ( आदेश क्रं.डी.सी./ कार्या 9ब1/ 855 /2020,दि.14/04/2020)अन्वये वगळण्यात आलेल्या बाबींमध्ये खालील नमूद अतिरीक्त बाबींचा समावेश करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
क) कृषी विषयक बाबी:- 1) कृषी विषयक सर्व कामे .
2) तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील
3) ज्या ठिकाणी फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी,अधिकृत /नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. सदर लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.आयुक्त,अहमदनगर शहर महानगरपालिका व मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/नगरपंचायत)यांनी
त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ना आवश्यक ते सहकार्य करावे.
4) कृषी यंत्राशी संबंधित Custom Hiring Centres (CHC) सुरु राहतील.
5) कृषी संबंधित उपकरणे/यंत्रे यांची निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने,खते, किटकनाशके व बी-बीयाणे यांची
दुकाने सुरु राहतील. 6) पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्सम यांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतूकीची परवानगी असेल.
7) शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री.
ख) आस्थापना:-
1) इलेक्ट्रॉनिक माध्यमे(ब्रॉडकास्टींग, डीटीएच, केबल सेवा), माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा (50% कर्मचारीसहीत), ग्रामपंचायत स्तरावरील सीएससी सेंटर्स सुरु राहतील. मात्र त्यांनी सदर सेवा पुरवितांना Social Distancing चे पालन काटेकोरपणे करावे.
2) प्रिंट मिडीयाला दिनांक 20 एप्रिल2020 पासून सुट देण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रे व मासिक यांचे द्वारवितरण ग्राहकाच्या पूर्वसंमतीने अनुज्ञेय राहिल. तथापि द्वारवितरण करणा-या व्यक्तीस सॅनिटायझर व मास्क वापरणे बंधनकारक राहिल. तसेच त्यांनी Social Distancing चे पालन काटेकोरपणे करावे.
3) कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींचे देखभालीकरीता सहाय्यभुत ठरणा-या व्यवस्थापन सुविधा सुरु राहतील.
4) विज निर्मिती, वितरण आणि पारेषण यांचेकरीता आवश्यक असणा-या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती करणारे दुकाने वर्कशॉप सुरु राहतील.
घ) सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम:-
1) बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला विधवा यांची निवारागृहे, निवासगृहे सुरु राहतील.
2) अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहेसुरु राहतील.
3) जेष्ठ नागरीक/विधवा/स्वातंत्र्य सैनिक/संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना यांच्या निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु राहतील.
4) सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला बालके, महिला, स्तनदा माता यांचा पोषण आहार घरपोच देतील. कोणत्याही लाभार्थ्याला अंगणवाडीत बोलावले जाणार नाही.
च) मत्सोत्पादन व पशुसंवर्धन:-
1) मत्स्यव्यवसाय व त्या संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग सुरु राहतील.
2) मत्स्य बीज उत्पादन व खाद्य पुरवठा करणारे उद्योग सुरु राहतील.
3) दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री,
प्रक्रीया, वितरण करणारे, वाहतूक व पुरवठा
करणा-या यंत्रणा सुरु राहतील.(सकाळी 5 ते 8 व सायं. 5.00 ते 7.00 वाजेपर्यंत)
4) पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्मव पशूखाद्याशी संबंधित असलेले, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे उदा. मका व सोया सर्व घटक सुरू राहतील.
छ) वनोत्पादन संबंधित:-
1) पेसा, बिगर पेसा व वनविभागाचे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये तेंदूची पाने गोळा करणे, वनोषधी गोळाकरणे, प्रक्रीया करणे, वाहतूक व विक्री व तत्सम उद्योग सुरु राहतील.
2) वनातील इमारती लाकूड गोळा करुन लाकूड डेपोमध्ये साठा/ वाहतूक/विक्री करता येईल.
ज) वित्तीय क्षेत्र:-
1) SEBI अंतर्गतचे बाजारसेवा, IRDA अंतर्गत असलेल्या विमा कंपन्या, को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी.
झ) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे :- 1) Social Distancing चे पालन करुन सुरु राहतील व
योजनेत काम करणारे सर्व कर्मचारी/मजूर यांनी काम करतांना मास्कचा वापर करावा
तसेच मनरेगाची कामे हाती घेतांना जलसिंचन वजलसंधारण विभागातील कामांना प्राधान्य
देण्यात यावे.
ट) सार्वजनिक सोयीसुविधा:-
1) पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी पीएनजी इ. इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे
उदा. Refining, वाहतूक, वितरण, साठवणूक वविक्री सुरु राहील (पेट्रोल विक्रीची वेळ सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत व डिझेल, सीएनजी विक्रीची वेळ सकाळी 05.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंतच राहील).
2) विज निर्मिती, पारेषण व वितरण सुरु राहील.
3) पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत) ,कुरिअर सेवा देणा-या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट सेवा सुरु राहतील.
4) महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कचरा
व्यवस्थापनाची कामे सुरु राहतील.
5) दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील.उदा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, वाहनाद्वारे पशुखाद्य पुरवठा करणे.
ठ) वाहतूक क्षेत्र:-
1) सर्व वस्तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्वेद्वारे वस्तू, माल, पार्सल यांची ने-आण करता येईल.
2) सर्व प्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारे
ट्रक व तत्सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्पर यांच्यासोबतच वाहतूककरतील. तसेच माल, वस्तू पोहोच केल्यानंतर
रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतूकी साठी परवानगी असेल, तथापि वाहन
चालवणाऱ्या कडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील.
3) ट्रक व तत्सम माल वाहतूक करणा-या वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने सुरु राहतील. तथापि संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सुचना,
आदेश, निर्देशांचे गांर्भियाने पालन करावे लागेल व SocialDistancing चे नियम पाळावे
लागतील.
4) रेल्वे वाहतुकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी/ कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना संबंधितआस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल.
5) अत्यावश्यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहनचालक व पाठीमागील सिटवर केवळ एक व्यक्ती आणि दुचाकी वाहनां करीता केवळ वाहन चालक यांनाच परवानगीगराहील.मात्र जिवनावश्यक
वस्तूंचे खरेदीकरीता लोकांनी जवळचे दुकानावर पायीच जाणे अभ्रिप्रेत आहे.(कोणत्याही प्रकारच्या टॅक्सीऑटो रिक्षा,सायकल रिक्षा,खाजगी दुचाकी व खाजगी कार यांना कोणत्याही प्रकारे वाहतूकीची परवानगी असणार नाही.)
6) औदयगिक आस्थापनांकरीता यापूर्वी दिलेले आदेश ( क्रं.आव्यमपु/कार्या19अ/328/2020 दिनांक 20/04/2020) लागू राहतील.
ड) बांधकाम क्षेत्र:-
1) रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प,सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची बांधकामे (ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू व मध्यम प्रकल्पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणा-या तारा ओढणे, ऑप्टीकल केबल/ फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील. तथापि संबंधित कामांची पडताळणी त्या त्या विभागातील संबंधित अधिकारी यांनी करावी. तसेच या प्रकारच्या कामावर असणा-या मजूरांची जेवण व राहण्याची सोय संबंधित ठेकेदार यांनीच करावी व Social Distancing चे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी. कामाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पुरेशी सुविधा, मास्क,सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची राहील.
2) अत्यावश्यक मान्सुन पूर्व कामे, रिन्युएबल
उर्जा प्रकल्पांची कामे सुरु राहतील.
4) ज्या ठिकाणी कामावर कामगार उपलब्ध आहेत व बाहेरील ठिकाणाहून कामगार आणण्याचीपरवानगी आवश्यकता नाही, अशा प्रगतीपथावरअसणा-या बांधकाम प्रकल्पांची महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील कामे सुरू राहतील. तथापि कोणत्याही नव्या कामास परवानगी असणार नाही.
या आदेशाप्रमाणे वरील बाबींना सुट दिलेली असली तरी लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45)चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Post a Comment