अहमदनगरकरांना धाकधुकच ; जिल्ह्यातील ५७ व्यक्तींच्या रिपोर्टची प्रतीक्षा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित असून आज आणखी २४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १२३५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ११६६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आज पाठविण्यात आलेल्या अहवालात १४ दिवस पूर्ण केलेल्या ९ कोरोना बाधीत व्यक्तींच्या स्त्राव चाचणीचा समावेश आहे.
जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते कालपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. आज सारीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment