श्री विशाल गणेश मंदिर च्या वतीने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी एक लाख रुपायांची मदत
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - देशात व राज्यात कोरोना ने थैमान घातले असून त्यामुळे सर्वत्र
लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परीस्थतीत देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहनास प्रतिसाद देऊन नगरच्या श्री विशाल गणेश मंदिर च्या वतीने एक लाख रुपयाची मदत केली. असल्याचे अध्यक्ष ऍड अभय आगरकर यांनी सांगितले त्यांनी सांगितले कि मुख्यमंत्री सहायता निधी साठी रुपये ५० हजार ,तर पंतप्रधान केअर फ़ंडामध्ये रुपये २५ हजार , तसेच नगरमधील जनकल्याण समिती यांना समाजातील गरजू लोकांना धान्य वाटपा साठी रुपये २५ हजार ची मदत करण्यात आली आहे.
ऍड अभय आगरकर म्हणाले कि देशात व राज्यात आलेले संकट दूर करण्यासाठी सर्वानी पुढे येण्याची गरज आहे लॉक डाऊन मुळे आज सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत सर्वानी प्रशासनाचे नियमाचे काटेकोर पणे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सागितले . श्री विशाल गणेश मंदिर च्या वतीने मदत देण्याचा निर्णय हा सर्व विश्वस्त यांना विचारून घेण्यात आला आहे जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा आम्ही त्याला धावून जाऊन मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे , सचिव अशोकराव कानडे ,सहसचिव रामकृष्ण राऊत , विश्वस्त पांडुरंग नन्नवरे ,विजय कोथींबीरे ,बाबासाहेब सुडके , हरिश्चन्द्र गिरमे ,भाऊसाहेब फुलसौदर ,चंद्रकांत फुलारी ,बापूसाहेब एकाडे
,ञानेश्वर रासकर ,गजानन ससाणे ,रंगनाथ फुलसौदर,शिवाजी शिंदे ,प्रकाश
बोरुडे आदीनी फोनवरून चर्चा केली.
आज हुनुमान जयंती निमित्त माळीवाडा पंचमंडळच्या वतीने शनी मारुती मंदिर येथे पुजारी संगमनाथ महाराज यांच्याहस्ते महापूजा करून आरती सकाळी ६ वाजता करण्यात आली. नेहमी जयंतीला गजबजणारी मंदिरे मात्र यावेळी कोरोना मुळे शांत व सुन्न होती
Post a Comment