मास्कचा वापर अनिवार्य ; गृहमंत्र्यांचे आवाहन


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह राज्यातील ज्या शहरांमध्ये व भागांमध्ये कोरोनाचा प्रभाव आढळून आला आहे, त्या ठिकाणी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post