खाजगी वाहनांसाठी पेट्रोल बंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : लॉक डाऊन कालावधी वाढविल्याने प्रशासनाने नवीन आदेश जारी केले आहेत. यात आता किराणा दुकानाचे वेळापत्रक दिले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी इंधन बंदी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लॉक डाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जमावबंदीचा नव्याने आदेश काढला आहे. खाजगी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांना ओळ्खपत्रांची खात्री केल्याशिवाय सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत इंधन देण्यात येईल.

किराणा दुकानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील. दूध वाटपाची वेळही सकाळी ५ तेे ८ व सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान राहिल.

शेती मालाच्या निगडित दुकाने सुरू राहतील. जनावरांचे खाद्य दुकानही उघडी राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबाला मदत करताना कोणीही फोटो काढल्यास व ते सोशल मीडियावर टाकल्यास किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे वाटप करताना चे फोटो प्रसारित केल्यास फोटोमध्ये असणारे संबंधितावर गुन्हा दाखल करू असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post