महाराष्ट्रात 402 बळी ; रुग्णसंख्या 9,341 वर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. राज्यात मंगळवारी ७२९ नवे रुग्ण, तर ३१ बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या ९,३४१ झाली असून बळींचा आकडा ४०२वर गेला. मंगळवारी १०६ रुग्णांसह आजवर १३८८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी मुंबईत तब्बल ३९३ नवीन रुग्ण तर २५ कोरोना बळींची नोंद झाली. पुण्यातही एकाच दिवसात १४३ नवीन रुग्ण आणि ३ जणांचा मृत्यू झाला.नागपुरातहीकोरोनाचा दुसरा मृत्यू झाला आहे.मोमीनपुरा वस्तीतील रहिवासीअसलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमावर २१ एप्रिल पासून इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते.
अकोला कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर, आज आणखी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील एकूण रुग्ण संख्या 27 झाली आहे. दुसरीकडे, सोलापूरमध्ये 13 रुग्ण सापडले असून, शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 81 वर पोहचला आहे.
Post a Comment