महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 801 वर; पुण्यात चोवीस तासात 5 जणांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. बुधवारी महाराष्ट्रात ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २,८०१वर गेला आहे. यातच आता आज पुण्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यात ७३आणि ३४ वर्षीय पुरुषाचा आणि आणखी दोघांचा आहे. मागील चोवीस तासात पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.यासोबतचपुण्यातील आत्तापर्यंत मृत संख्या ४२झाली आहे.
यातच आता चांगली बातमी आली आहे. औरंगाबादमधली दुसरी महिला ठरली कोरेना मुक्त सोशल झाली आहे.औरंगाबाद शहरातील एन-४परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, औरंगाबाद महानगर पालिकेने शहरात १३ विशेष अशा फीव्हर क्लिनिकची स्थापना केली आहे. शहरातील संशयित कोविड-१९ रुग्णांमधून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
हिंगोलीजिल्ह्यातहीएकमेव कोरोना बाधीत रुग्णाचा आयसोलेशनचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला पहिला स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेच निःश्वास सोडला आहे. आता सध्याच्या स्थितीत हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
मंगळवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईत ११, पुण्यात ४ व नगर, औरंगाबादच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा १८०वर गेला आहे. राज्यात ४६,५८८ चाचण्यांपैकी ४२,८०८ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
Post a Comment