महाराष्ट्रासमोर कोरोनाबरोबर आर्थिक संकटही उभं; शरद पवार यांचे पंतप्रधान व अर्थमंत्री यांना पत्र
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनासारख्या महामारीच्या आजारानं देशाबरोबर महाराष्ट्रालाही वेठीस धरलं आहे. जनजीवनाबरोबर अर्थगाडाही लॉकडाउनमुळे रूतून बसला आहे. राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे राज्यासमोर करोनाबरोबर आर्थिक संकटही उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून संभाव्य आर्थिक संकटाबद्दल इशारा दिला आहे.
शरद पवार यांनी करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीबदल पत्र लिहून माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याच्या तिजोरीत ३,४७,००० कोटी रुपयांचा महसुल येण्याचा अंदाज होता. मात्र, लॉकडाउनमुळे राज्याला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे १,४०,००० कोटी तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे,” असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
Post a Comment