बळीराजाला खुशखबर ; यंदा सरासरी इतका पाऊस पडणार
जून ते सप्टेंबर महिन्यात ९६ ते १०० टक्के पाऊस
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – यंदा सरासरी इतका तर ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाने मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.
सध्या अवघा देश कोरोना नावाच्या संकटाशी लढतो आहे. अशात हवामान खात्याने दिलेली बातमी ही काहीशी दिलासा देणारी आहे.भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता २१ टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के आहे.
Post a Comment