स्टॉक रजिस्टर तपासून लॉकडाऊन काळात दारू विकलेल्या परमिट रूम व वाईन शॉपवर कारवाई करा
निर्भय नवजीवन फाउंडेशनची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरातील सर्व परमिट रूम व वाईन शॉप तसेच होलसेल व्यापारी यांचे दारूचे स्टॉक रजिस्टर चेक करून त्यांनी लॉकडाऊन दरम्यान बेकायदेशीर विकलेल्या दारू विषयी कारवाई करण्यात यावी अशी मागणी निर्भय नवजीवन फाउंडेशन संदीप अशोक भांबरकर यांनी केली आहे.
भारतात करोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यांचा प्रभाव रोखण्यासाठी केंद सरकार संपूर्ण देशांत लॉकडाऊन घोषित केले आहे. परंतु नगर शहरातील काही परमिट रूम वाईन शॉप व होलसेल धारकांनी लॉकडाऊन असतांना सर्व नियम पायदळी तुडवून त्यांच्या परमिट रूम व वाईन शॉप मधील तसेच होलसेल गोडाऊन मधील देशी विदेशी दारूचा माल चढ्या भावाने विकली केला आहे. सदर विक्री ही त्यांचे दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील करण्या आधीच झालेली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार सर्व परमिट व वाईन शॉप धारकांना नियम ठरून दिलेले आहे. त्यानुसार त्यांना रोज तत्यांचा माल किती प्रमाणात खप होतो. यांची दैनंदिन माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी लागते.
जिल्हाधीकरी यांनी दि. 19 मार्च 2020 रोजी दुपारी 4नंतर नगर शहरात लॉकडाऊन घोषित केले. त्यानुसार दि .17 व 18 रोजीची संपूर्ण मालाची माहिती ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली असेलच. त्यानुसार व आत्ताच स्टॉक माल याची तपासणी करण्यात यावी. बेकायदेशीर विक्री केलेल्या माला विषयी राज्य उत्पादन शुल्क विभागात सांगून सर्व माल रजिस्टर चेक करून लॉकडाऊन समाप्त होण्याआधीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी भांबरकर यांनी केली आहे.
Post a Comment