संचारबंदी काळातही मद्य विक्री; 85 जण घेतले ताब्यात
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 133 ठिकाणी मारले छापे / तीन दारु दुकानांचे परवाने तात्काळ निलंबित
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- देशात तसेच राज्यात करोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने 14 एप्रिल पर्यत लॉक डाऊन ठेवण्यात आला असतांनाही जिल्ह्यात अवैध दारु विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात 133 ठिकाणी छापे टाकून 36 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यातील परमिटरुम व मद्यविक्री दुकाने येथे होणारी ग्राहकांची गर्दी लक्षात घेता करोना विषाणूचा संसर्ग होऊन मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता असल्याने 19 मार्च रोजी आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य विक्री 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश असतांनाही तसेच करोना विषाणुच्या संसर्गाने बाधीत होणार्या नागरीकांचे वाढते प्रमाण पाहता देश लॉक डाऊनचा कालावधी असतांनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत असल्याचे लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत जिल्ह्यात 133 ठिकाणी कारवाई करून 85 आरोपी ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून देशी विदेशी दारु, हातभट्टी व ताडी, स्पिीरीट असा अंदाजीत 36 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पराग नवालकर, निरीक्षक एस.एम सराफ, ए.बी. बनकर, ए.व्ही.पाटील, डी.एल.जगताप, बी.टी. घोरतळे, आर. डी. वाझे यांच्या पथकाने कारवाई केली.
Post a Comment