ठाकरे सरकारमधील 'हा' मंत्री तब्बेत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. महाराष्ट्र सरकारमधील गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री अचानक तब्येत खराब झाल्यामुळे ठाण्यातील फोर्टिस हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आधी त्यांना ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथून त्यांना फोर्टिसमध्ये शिफ्ट करण्यात आले. आपल्या स्टफमधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आव्हाडांनी स्वतःला क्वारेंटाइन केले होते. परंतू, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांना अचानाक ताप आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे परत एकदा त्यांची कोरोना चाचणी होणार आहे.
Post a Comment