कोरोनाच्या सुरुवातीला चीनमधून 4.30 लाख जण आले अमेरिकेत
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंगटन - कोरोना प्रसाराच्या सुरुवातीच्या दिवसात चीनमधून १३०० उड्डाणांतून सुमारे ४.३० लाख जण अमेरिकेत आले होते. यातील ४० हजार जण अमेरिकेत पुढे फिरत राहिले. वारी फ्लाइट, माय राडार, फ्लाइट अवेअर आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीत हा दावा करण्यात आला आहे. या संस्था चीन व अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांच्या नुसार प्रवास बंदीच्या आधी ही उड्डाणे अमेरिकेतील १७ राज्यांत गेली होती. चीनने ३१ डिसेंबर २०१९ ला त्यांच्याकडे कोरोना असल्याचा खुलासा केला होता. अमेरिकेत जानेवारीच्या सुरुवातीला कोरोनाचे गांभीर्य समजत नव्हते. विमानतळावर प्रवाशांच्या तपासणीत सक्ती दाखवली नाही. स्क्रीनिंग जानेवारीच्या मध्यात सुरू झाली. त्यातही केवळ वुहान ते लॉस अँजिल्स, सॅन फ्रन्सिस्को, न्यूयॉर्कच्या विमानतळावर आलेल्या प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात आली. वारीफ्लाइटने सांगितले की, त्या काळातही सुमारे ४ हजार जण वुहानहून सरळ अमेरिकेत आले.
असा होता मार्ग : ३.८१ लाख प्रवासी सरळ चीनहून आले
इंटरनॅशनल ट्रेड अॅडमिनिस्ट्रेशननुसार ३.८१ लाख जण चीनमधून सरळ अमेरिकेत आले होते. यातील एक चतुर्थांश अमेरिकी होते. इतर लोक इतर देशांमधून चीनमार्गे अमेरिकेत आले होते. होमलँड विभागाच्या प्रवक्त्या सोफिया बोझा यांनी सांगितले, इतर देशांमधून आलेले प्रवासी २५% असू शकतील.
१० मार्चला अँड्रयू व्हू (३१) बीजिंगहून थेट उड्डाणाने लॉस अँजिल्स विमानतळावर आले होते. अँड्रयू सांगतात, विमानतळावरील सौम्य तपासणी प्रक्रियेमुळे मी हैराण झालो. अधिकाऱ्यांना चांगली तपासणी करण्याविषयी सांगितले. मात्र, त्यांनी गांभीर्य दाखवले नाही.
२३ मार्चला सबरीना फिच (२३)चीनहून न्यूयॉर्कला आली. सबरीनाने सांगितले की, विमानतळावर त्यांचा व ४० इतर लोकांचा दोनदा ताप मोजण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून एका फॉर्मवर आरोग्याची माहिती घेण्यात आली. केवळ आमचा पासपोर्ट बघितला. इतर प्रश्न विचारले नाहीत.
Post a Comment