कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये स्क्रीनिंग गनद्वारे नागरिकांची तपासणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छावणी परिषदेच्या वतीने भिंगार येथील नागरिकांची स्क्रीनिंग गनद्वारे तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
यावेळी छावणी परिषदेचे आर.एम.ओ. डॉ.जैयस्वाल, मतीन सय्यद, डॉ.गितांजली पवार, रोहित परदेशी, राहुल ढाकणे, निलम परदेशी आदि उपस्थित होते.
छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भिंगार मधील सर्वच नागरिकांची स्क्रीनिंग गनद्वारे तपासणी करुन घेण्याची मागणी केली होती. यासाठी भिंगार छावणी परिषदेत दोन स्क्रीनिंग गन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भिंगारमध्ये एकूण 25 हजार लोकसंख्या असून, दोन दिवसात स्क्रीनिंग गनद्वारे 5 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी संदर्भात जनजगृती करुन, नागरिकांच्या मनातील भिती काढली जात आहे.
Post a Comment