दहावी भूगोल परीक्षा रद्द होणार ; मिळणार सरासरी गुण ?



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावेत, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवा यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी येत्या 4 दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. 31 मार्चनंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून पेपर केव्हा घ्यावयाचा याचा निर्णय घेण्यात येणार होता. पण लॉकडाउन व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी भूमिका माजी मंत्री आ. मुनगंटीवार यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post