तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या अजून एका अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा असून रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत येणार आहे. तो ही अहवाल निगेटीव्ह आल्यास उद्या शुक्रवारी (दि.१०) त्यास घरी सोडण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
दरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १००२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे तर दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. एकूण ८४८ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप १२२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात १५३ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५६१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.
Post a Comment